Ad will apear here
Next
रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर कॉलेजमध्ये झाली पहिली राष्ट्रीय आभासी परिषद; जैवविविधतेबद्दल चर्चा


रत्नागिरी :
करोना संसर्गामुळे लॉकडाउन सुरू असल्याने प्रत्यक्ष कार्यक्रम होऊ शकत नसल्याने, ऑनलाइन साधनांचा कल्पक वापर वाढला आहे. रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात पर्यावरणदिनानिमित्ताने ‘जैवविविधता आणि शाश्वत विकास’ या विषयावर दोन दिवसांची ऑनलाइन राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. अशा प्रकारची या महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेली ही पहिलीच राष्ट्रीय परिषद होती. पाच आणि सहा जूनला झालेल्या या परिषदेत देशभरातून २४ राज्यांतील १९५ व्यक्ती सहभागी झाल्या होत्या.

पाच जून या जागतिक पर्यावरणदिनानिमित्त या वर्षी संयुक्त राष्ट्रसंघाने जैवविविधता ही संकल्पना जाहीर केली होती. त्यामुळे जैवविविधता आणि शाश्वत विकास हा विषय घेऊन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. लॉकडाउन सुरू असल्याने ही परिषद ऑनलाइन घेण्याचे ठरले. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचा वनस्पतिशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठाचे रत्नागिरी उपकेंद्र, मुंबई विद्यापीठ आणि रत्नागिरीतील पर्यावरण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात आली होती. 

परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी वनस्पतिशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. मंगल पटवर्धन यांनी व्हिडिओ क्लिप्सच्या माध्यमातून या परिषदेमागची संकल्पना व त्याची आवश्यकता विशद केली. गणित विभागाचे प्रमुख डॉ. राजीव सप्रे यांनी या परिषदेसाठी कोणते माध्यम व्यासपीठ वापरण्यात येणार याची माहिती दिली. प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी परिषदेत भाग घेणाऱ्या सर्व सहभागी व्यक्तींना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. तसेच पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले. उद्घाटन कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन यांनी केला. या सत्राचे संचालन डॉ. सोनाली कदम यांनी केले. 

या परिषदेत विविध सत्रांमध्ये प्रोफेसर डॉ. जनार्दनम् (गोवा विद्यापीठ, प्लांट अॅनिमल इंटरॅक्शन), प्रोफेसर यादव, (माजी विभागप्रमुख, वनस्पतिशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर - पश्चिम घाटातील जैवविविधता), डॉ. ढाकेफळकर (संचालक, आघारकर संशोधन संस्था, पुणे - Molecular Exploration of Diverse Microbes for Taxonomic Novelty and Industrial Applications) व डॉ. अंकुर पटवर्धन (जैवविविधता विभागप्रमुख, गरवारे कॉलेज, पुणे - Butterfly odorants to enhance pollination and ecosystem health’) यांची बीजभाषणे झाली. जैवविविधतेचे संरक्षण, जतन, संवर्धन, त्यासाठी वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव इत्यादींनी एकमेकांना केलेले सहाय्य व माणसाच्या विकासासाठी त्या सर्व घटकांचे जतन करण्याची गरज आदी गोष्टींवर त्यांनी भाष्य केले. 

त्यापैकी ५७ सहभागींनी आपले शोधनिबंध पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन व पोस्टरच्या व्हिडिओ माध्यमातून पाच वेगवेगळ्या सत्रांमध्ये सादर केले. या सत्रांमध्ये प्रश्नोत्तरे, तसेच अभिप्राय चॅटबॉक्सच्या साह्याने संचलित करण्यात आले. 



वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. मंगल पटवर्धन यांच्या कल्पनेतून साकार झालेला हा गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचा आभासी परिषद घेण्याचा पहिलाच उपक्रम होता.प्रत्यक्ष रत्नागिरीला न येता जम्मू-काश्मीर, ओडिशा, मेघालयपासून ते तमिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ आदी २५ राज्यांतून तंत्रज्ञानाच्या मदतीने १९५ जण यात सहभागी झाले होते. तंत्रज्ञान टीममधील प्रा. ऋजुता गोडबोले (वनस्पतिशास्त्र विभाग), प्रा. वरुणराज पंडित (आयटी विभाग) व प्रा. प्रतीक शितूत (गणित विभाग) यांनी यासाठी परिश्रम घेतले. वनस्पतिशास्त्र विभागातील प्रा. शरद आपटे व प्रा. प्रियांका शिंदे, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, उपप्राचार्य विवेक भिडे, गणित विभागप्रमुख डॉ. राजीव सप्रे, भूगोल विभागप्रमुख डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी विभाग प्रमुख प्रा. जी. एस. कुळकर्णी, प्रसाद गवाणकर यांच्या सहकार्याने ही परिषद पार पडली.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZCKCN
Similar Posts
‘उच्च शिक्षणासाठी सामाजिक संस्थांचा हातभार महत्त्वाचा’ पुणे : ‘शेतीविषयक शिक्षणामध्ये नाविन्यपूर्ण बदल केले जात आहेत. सरकारनेही चांगल्या योजना निर्माण केल्या आहेत. शिवाय, आपल्याकडे बहुतांश विद्यार्थी मुख्य व्यवसाय शेती असलेल्या भागातून येतात. मात्र, आर्थिक पाठबळाच्या अभावामुळे त्यांना उच्च शिक्षण घेण्यात अडचणी येतात. अशावेळी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या
नर्सिंग कौशल्याद्वारे देशाच्या विकासात योगदान द्यावे रत्नागिरी : ‘विद्यार्थिदशा करिअर घडवणारी असून, नियमित व्यायाम, योगासने, योग्य वेळी नाश्ता, जेवण ही एक साखळी आहे. यातील कोणतीही गोष्ट अवेळी केल्याने प्रश्न उभे राहतात. त्यामुळे शिस्तीने वागावे, संगीत ऐकावे. त्यातून आपल्या क्षमतांचा विकास होतो. नर्सिंग कौशल्याद्वारे आपण देशाच्या विकासात योगदान द्यावे,’
ट्रिनिटी अॅकॅडमीत साकारणार एक लाख वृक्षांची देवराई पुणे : ‘जागतिक तापमान वाढ आणि प्रदूषणाचा विळखा घट्ट होत असताना त्याला सामोरे जाण्यासाठी स्वच्छ, निरोगी वायू देणाऱ्या देशी वृक्षांची लागवड करणे खूप गरजेचे आहे. ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. या देशी वृक्षांपासून आपल्याला शुद्ध हवा, फुले आणि मधुर फळे मिळतात. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात वाढदिवस किंवा
कोकणातील ‘टॅलेंट’ झळकले; नऊ जणींची कॉग्निझंट, इन्फोसिसमध्ये निवड रत्नागिरी : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या रत्नागिरीतील शिरगाव येथील बीसीए कॉलेजमध्ये शिकणाऱ्या नऊ मुलींची कॉग्निझंट आणि इन्फोसिस या नामवंत आयटी कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. बीसीए कॉलेजसह पुणे येथील के. बी. जोशी इन्स्टिट्यूट ऑफ आयटी (बीसीए) यांच्या संयुक्त विद्यमाने या कंपन्यांच्या कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language